shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहीद स्मारक या ठिकाणी २६ / ११‌हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली..


 वडाळा महादेव प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील शहीद स्मारक या ठिकाणी  २६ / ११ मुंबई शहरावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी येथील श्रीरामपूर तालुका माजी सैनिक संघटना .रोटरी क्लब .इनरव्हील क्लब .यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  यावेळी एक दिवा शहिदांसाठी प्रज्वलित करून उपक्रम राबविण्यात आला  मेजर बाळासाहेब उंडे  यांनी मनोगत व्यक्त करत श्रीरामपूर शहरात सर्वांच्या सहकार्याने शहीद स्मारक उभे राहिले यासाठी सर्व आजी माजी सैनिक यांचे सहकार्य लाभले तसेच शहरातील सर्व विविध प्रकारच्या  संघटना यांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल माहिती दिली.

प्रसंगी मा. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, भाजपाचे  दीपक अण्णा पटारे, ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, अध्यक्षा शितलताई कुंदे,उल्हासराव धुमाळ, विनोद पाटणी, डॉ.अनिल घोगरे,संदीप शहा, पत्रकार अनिल पांडे, दीपक उंड, श्वेता शहा, सुनीता धुमाळ, कल्पना बनकर, पुनम गांधी, प्रिया शहा, शेडगे दीदी, डॉ. शितल घोगरे,  सौ. प्रज्वला मुंडे, सौ. रेखा लगड, सौ. सिन्नरकर, सौ. उज्वला उंडे आदी महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी सैनिक संघटना अध्यक्ष मेजर श्री बाळासाहेब उंडे, त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर अनिल लगड, मेजर कृष्णा सरदार,मेजर बाळासाहेब बनकर, मेजर रवींद्र कुलकर्णी, मेजर अनिल सिन्नरकर, मेजर वाणी, मेजर असलम शेख,मेजर घनश्याम मिसळ, मेजर गुलदगड, मेजर अशोक धायगुडे, मेजर राजू शिंदे, महिला अध्यक्षा छायाताई मोठे तसेच सर्व आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अध्यक्षा शितलताई कुंदे बाळासाहेब उंडे,अनिल लगड यांनी मानले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close