shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती वतीने "संविधान सन्मान अभियान " उदघाट्न समारंभ संपन्न

श्रीरामपूर प्रतिनिधी :
साहित्यिक व कलावंताना लिखान व कलेच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांनी  दिलेल्या संविधान मुळेच प्राप्त झाले असून त्या संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कलावंत न्याय हक्क समिती चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मा.गायक सोमनाथ गायकवाड यांनी श्रीरामपूर येथे संविधान सन्मान अभियानाच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती विद्यमाने संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.


      श्रीरामपूर येथे संविधान दिन निमित्त राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना "महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती विद्यमाने २६ नोव्हेंबर म्हणजे संविधान गौरव दिनानिमित्त संविधान सन्मान अभियान उदघाटन समारंभ शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमाची सुरुवात घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व संविधानाच्या प्रतिस पुष्पफुले वाहून करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र कलावंत न्याय्य हक्क समितीचे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष ॲड.अण्णासाहेब मोहन यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले.  

साहित्यिक व कलावंत यांना अभिव्यक्ती व लिखाण स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिल्यामुळे प्रत्येक साहित्यिक व कवी, कलावंत यांनी महामानव भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानचा सन्मान राखणे हे प्रत्येक साहित्यिक व कवी, कलावंत यांची जबाबदारी असून महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती ही महाराष्ट्रातील वंचित शोषित समाजातील साहित्यिक व लोककलावंत यांची संघटना असून कलावंतांनी लोक कलेच्या माध्यमातून संवैधानिक विचार समाजात पेरले पाहिजे. याकरिता २६ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान हे संविधान सन्मान अभियान राबविण्यात येणार असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंताच्या माध्यमातून संविधानाचा गौरव करण्यात येणार असे उदगार महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी चित्रपट गीतकार कवी राम गायकवाड, प्रसिद्ध मुखपुष्ठ चित्रकार अरविंद शेलार, प्रसिद्ध गजलकार, कवी रज्जाक शेख, कवी बाबासाहेब पवार, कवी राजेंद्र थोरात, शाहीर भीमराव कदम, राजेंद्र भालेराव, रिपाई चे सुभाष त्रिभुवन, ऑर्केस्ट्रा मेलोडी किंग संचालक गायक प्रदिप गायकवाड, ग्रामीण कवी आनंदा साळवे यांनी काव्य सादरीकरण करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्याच प्रमाणे बाल कलाकार ओवी प्रसाद काळे हिने भिम पोवाडा गाऊन उपस्थित मान्यवर व नागरिकांची मने जिंकली.

याप्रसंगी भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांस मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांस आपली प्रगती करण्याची व प्रतिष्ठा जपण्याची समान संधी प्राप्त झाली, असे असतांना घटनेप्रमाणे वर्तमान परिस्थिती आहे का ? याची आपल्याला समीक्षा करावी लागेल, असे बामसेफ चे रमेश मकासरे यांनी नमूद करत भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील प्रत्येक शब्दावर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. ज्ञानेश्वर वानखेडे हे होते. भारतीय संविधाची प्रास्तावना हे भारतीय संविधानाचा आत्मा असून मूलभूत हक्कांचा उपभोग घेत मूलभूत कर्तव्यही बजावणी भारतीय नागरिकांचे अद्य कर्तव्य असे प्रतिपादन करून संविधानातील तरतुदीबद्दल कायदेशीर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन दिवे सर, शिक्षण अधिकारी पंचायत समिती, प्रा. लक्ष्मण डांगे सर, समन्वयक उमेद अभियान बाळासाहेब भिंगारदिवे, न्यायालयीन कर्मचारी दिगंबर भोंगळे सर, रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, नवं स्वराज्य सेनेचे विजय खाजेकर, बामसेफचे रमेश मकासरे, मुस्ताकभाई तांबोळी- मुस्लीम मोर्चा, मल्लू शिंदे- भटके विमुक्ताचे नेते, संजय वाव्हुल भीम पॅथर, अशोक ठोकळ, पत्रकार- संदीप जगताप, भीम प्रहार न्यूज, सौं.सारिकाताई मोहन, प्राध्यापिका वैशालीताई काळे, ॲड. महामाया अडसूळ / ठोकळ आदी फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे सिने अभिनेते रमेश जाधव (प्रदेश उपाध्यक्ष कलावंत न्याय हक्क समिती), जगदीश सोनवणे, महासचिव बलराज आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन अँकर असोसिएशन चे प्रमुख राजेंद्र कुमार हिवाळे सर यांनी केले पाहुण्यांचे स्वागत , प्रस्तावना व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब मोहन यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद काळे सर, सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे, कु. शिवराज वानखेडे, कु. स्वराज मोहन, कु. सांची मोहन इत्यादींनी परिश्रम घेतले.


*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close