कोल्हार भगवतीपूर प्रतिनीधी:
राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांकडून जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या मुलांना दिवाळी निमीत्त फराळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या व शाळा सुरु झाल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा या शेजारी - शेजारी एकाच कंपाऊंडमध्ये आहे.
सर्व मुले मिळून मिसळून राहतात. नुकतीच दिवाळी साजरी झाली. परंतु आपले मुस्लीम बंधु भगिनी यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ही संकल्पना पत्रकार राजमोहंमद शेख यांनी मांडली यास श्रीराम विष्णुपंत ताडपत्रीकर, विनोद शांतीलाल गुगळे,मेजर राजेंद्र लोखंडे, जालिंदर रोडे, प्रवीण लोखंडे यांनी सहकार्य केले.या चिमुकल्यांकडून देखील आता सामाजिक एकोप्याचा हा छोटासा प्रयत्न यशस्वी झाला.
याप्रसंगी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नसरीन बाजी, परवीन बाजी, करिष्मा बाजी, श्री कानिफनाथ कोळेकर केंद्रप्रमुख, रंजना सोनवणे मुख्याध्यापक, बशीर शेख, संगीता भुसाळ, प्रकाश केदारे, संगीता कुळधरण, संगीता कापसे, सुरेखा सुंबे, सीमा देशपांडे,नितीन लोखंडे, श्याम लोखंडे, धनुभाऊ लोखंडे, किरण लोखंडे, सोनवणे सर,यांच्या समवेतमराठी आणि उर्दू शाळेतील चिमुकले विद्यार्थी तथा पालक आदि उपस्थित होते.
*पत्रकार राजमोहम्मद शेख - कोल्हार
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

