अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने अहमदनगर उपविभागातील मौजे झापवाडी शिवार, ता. नेवासा, जि.अहमदनगर येथील श्री. प्रमोद राधेशाम खंडेलवाल व इतर तीन यांची शेतजमिन गट नं. १७/२ ही अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोड लगत असलेल्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. हेलिपॅड परिसर त्याचप्रमाणे मौजे शनिशिंगणापुर, ता. नेवासा येथील शनैश्वर मंदीर व मंदीर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे उप विभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या परिसरात कोणीही ड्रोन कॅमेराव्दारे छायाचित्रण करण्यासाठी वापर करणारे ड्रोन चालक,मालक, संस्था, आयोजक व नागरिक यांनी ड्रोन कॅमेराचा किंवा तत्सम उपकरणाचा छायाचित्रीकरण करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजीचे १२.०० वाजेपर्यंत वापर करु नये. आदेशाचे उल्लंघन करणारा इसम भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ मध्ये नमुद केलेल्या शिक्षेस पात्र राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 9561174111

