अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :
जिल्ह्यात ९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असुन या लोकअदालतीच्या प्रचार, प्रसाराचा शुभारंभ जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेन्दाम, ॲड. अनिल सरोदे, ॲड. सुनिल मुंदडा, ॲड. संदिप वांदेकर, श्रीमती शोभा गाडे यांच्यासह सर्व विधीज्ञ, विधी स्वयंसेवक पक्षकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
वाहतुक नियमांचा भंग करणारे व मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर प्रलंबित तडजोड शुल्काचा भरणा न करणाऱ्या कसुरदार वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटले पाठविण्यात येणार असुन सर्व वाहनचालकांनी ९ डिसेंबर, २०२३ रोजी होणाऱ्या लोकअदालतमध्ये हजर राहुन प्रलंबित तडजोड शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.
आपल्या मालकीचे, ताब्यातील वाहनावर दंड प्रलंबित असल्यास ९ डिसेंबर रोजी होणारे लोकअदालतीपुर्वी भरणा करावा व होणाऱ्या न्यायालयीन कारवाईपासुन मुक्त व्हावे. दंडाच्या रक्कमेचा लोकअदालतीपुर्वी भरणा केल्यास लोकअदालतीकरीता न्यायालयात हजर राहण्याची गरज भासणार नसल्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेन्दाम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

