अहमदनगर - लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत अहमदनगर मधील ग्रेस म्युझिक अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यात ईशा बडवे, अशिता लोखंडे, अॅरन पंडित यांनी इलेक्ट्रॉनिक कि-बोड ग्रेड-१, तसेच भार्गवी ढोके, शर्लिन सोनावणे, ओजस राऊत यांनी इलेक्ट्रॉनिक कि-बोर्ड इनिशियल ग्रेड व ओंकार राऊत याने प्लॅकट्रम गिटार इनिशियल ग्रेड परिक्षेत गुणवत्तापुर्वक यश संपादन केले.
ग्रेस फौंडेशनच्या ग्रेस म्युझिक अॅकॅडमीच्या वार्षिक उत्सवानिमित्त शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ४.३० वा. माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर येथे वार्षिक म्युझिकल उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रेस म्युझिक अॅकॅडमीचे संचालक पिटर पंडित यांनी सांगितले.या म्युझिकल उत्सवावास प्रमुख पाहुणे म्हणून फादर ऑलविन मिस्किटा (एसडीबी), पवन नाईक (आंतरराष्ट्रीय सुफी गायक), धनेश बोगावत (संगीत तज्ञ) व सुहासभाई मुळे (संगीत समिक्षक) आदि उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ग्रेस म्युझिक अॅकॅडमीचे विद्यार्थी नवीन-जुने हिंदी-मराठी-इंग्रजी गीते सादर करतील. सर्वांना प्रवेश विनामुल्य आहे. तरी या संगीत उत्सवास रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन सोनाली पिटर पंडित यांनी केले आहे.
पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

