shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच सामाजिक क्रांती; माजी आ.भानुदास मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच सामाजिक क्रांती झाली. त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण व ज्ञानामुळेच बहुजन समाजात परिवर्तन घडेल, अशी त्यांची धारणा होती. शेती क्षेत्राची त्यांनी अर्थशास्ञिय मांडणी केली. शेतक-यांची दूरवस्था तसेच पाणी प्रश्नाबाबात त्यांनी ब्रिटिश सरकारचे कान टोचले. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी त्या माध्यमातून समाज प्रबोधनाची चळवळ उभी केली. म.फुले यांच्या विचारांची आजच्या सामाजिक पिछेहाटीच्या काळात अधिक गरज आहे, असे प्रतिपादन अशोक सह.साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

       लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांचे हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, माजी नगरसेवक हाजी मुक्तार शाह, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, रोहन डावखर, प्रवीण फरगडे, नितीन खंडागळे, नानासाहेब गांगड, शरीफ मेमन, विशाल धनवटे, वैभव सुरडकर, कैलास भागवत, रोहित मालकर, बाळासाहेब शिंदे, वसंत लबडे, राहुल लिहिणार, मनोज शेळके, संजय मोरगे आदी उपस्थित होते.

      अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरही महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्त व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चीफ अकौंटंट मिलींद कुलकर्णी, ज्ञानेश्वर सांगळे, अण्णासाहेब वाकडे, बाळासाहेब जाधव, विलास लबडे, बाबासाहेब तांबे, अनिल गुजर, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.

*पत्रकार इम्रान एस.शेख श्रीरामपूर
*सहयोग* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close