श्रीरामपूर प्रतिनिधी -
समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीत थोर समाज सुधारक व विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे महात्मा फुले हे खंबीर पुरस्कर्ते होते . त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण व शेतकऱ्यांचे हक्क या विषयी त्यांनी समाजात जनजागृती केली. समाजातील विषमता व गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण व त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा. नगरसेवक दिलीप नागरे, श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगल सिंग साळुंखे, युवराज फंड, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, रियाजखान पठाण, नवाज भाई जहागीरदार, सनी मंडलिक, युनुस पटेल, राजेंद्र सातभाई, नजीरभाई शेख, बाबा वायदंडे,भैय्याभाई अत्तार,वैभव कुऱ्हे, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, गणेश काते, संजय गोसावी,गोपाल भोसले, रितेश गिरमे, विशाल साळवे,राजेश जोंधळे, आकाश जावळे, श्रेयस रोटे, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार राजू मिर्जा
(नाशिक विभाग ब्यूरो चिफ)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

