shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला राजवर्धन पाटील धावले.

*अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला राजवर्धन पाटील धावले.
   इंदापूर प्रतिनिधि: पुणे सोलापूर हायवे वरील बिल्ट ग्राफिक कंपनीच्या जवळ अपघात होऊन एक नागरिक जखमी झाले होते.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील हे यावेळी येथून प्रवास करीत होते त्यांनी अपघातग्रस्त नागरिकाला पाहताच गाडी थांबवून त्यांची चौकशी केली त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
      युवा नेतृत्व राजवर्धन पाटील आपल्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. आज देखील अपघातग्रस्त नागरिकाला योग्य ती मदत व सहकार्य केले.
     आपल्या सुरक्षित प्रवासाची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन  यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.
close