shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता आपणच बदलू या! लेखांक पाचवा...

 (१२/११/२०२३)
माझ्या प्रीतीच्या फुला

डांबरी रस्त्यावर काम करणारी महिला आपल्या तान्ह्या मुलाला रस्त्याच्या बाजूला सावली करू शकत नाही या व्यथेतून निर्माण झालेले काळजाचा ठाव येणारे गीत... 
तप्तदिशा झाल्या चारी 
भाजतसे पृथ्वी सारी 
कशी करू तुझी सावली
माझ्या प्रीतीच्या फुला?
 तप्तदिशा ही रोजचीच समस्या झालेली आहे पण कालची रात्र भयानकच होती. चारीबाजूने फटाक्यांचे आवाज आणि त्या आवाजाची होणारी कंपने ही कशी थांबवायची ही अक्कल शून्य करणारी अशी समस्या होऊन बसली. फटाक्याच्या एकेका आवाजाबरोबर झाडावर झोपलेले पक्षी, घरातली मांजरं, कुत्रे आणि लहान बाळं बिचकून उठत होते. आणि त्या सर्व मातांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता आता हा आवाज मी कसा थांबवू शकेन. फटाक्यांच्या कंपनांमुळे पत्र्याच्या शेडमध्ये निर्माण होणारी भेदरून टाकणारी कंपनं. सहन करावं लागणारं जीवघेणं वास्तव सहन करीत आपल्या दचकून उठणाऱ्या बाळास पोटाशी धरणाऱ्या मातेच्या वेदना फटाके वाजवणाऱ्यांना कशा समजणार?
दिवाळी हा मांगल्याचा सण आहे. समाजामध्ये स्नेहभाव तयार होईल, परस्परांना आनंद कसा देता येईल अशा गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात असा संदेश मांगल्याची दिवाळी या शब्दातून दिलेला आहे. पण अलीकडे  प्रचंड आवाज देणारे फटाके बारा महिने उपलब्ध होत आहेत आणि असे फटाके वाजवणे हा पुरुषार्थ समजला जात आहे. लाखो लोकांची झोप आणि आरोग्य बिघडवण्यात जे आनंद मानतात, पुरुषार्थ समजतात. त्यांना कोण सुधरवणार? रस्त्यावरती हजारो खड्डे पडले असतील ते बुजवण्याची बुद्धी यांच्याकडे नाही. रहदारीच्या रस्त्यावर हजारो फटाक्यांच्या माळा लावून रस्त्यांना अजूनच हादरे द्यायचं काम ही मंडळी करत आहेत. कोण शिकवणार यांना?
आपल्याला बदलायला हवं!

देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने पुणे,
मोबाईल क्रमांक :९८८१३७३५८५
close