श्रीरामपूर प्रतिनिधी:
बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आसल्याने नफा कमावणे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व अभ्यास दौरे घेतले पाहीजेत. केवळ मर्जितील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दिवाळी फराळाचे फॕड सुरु झाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे व्यक्त केली आहे.
या पञकात मुरकुटे यांनी नमुद केले आहे की, बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. केवळ नफा कमावणे हा बाजार समितीचा उद्देश नाही. शेतकऱ्यांना सोयी सुविधा देणे व शेतीचे उत्पन्न वाढीसाठी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे ही शेतकऱ्यांची मुलभुत गरज आहे. माञ बाजार समितीच्या वतीने असे कार्यक्रम होताना दिसत नाहीत. बाजार समितीच्या व्यवस्थापनाला याचा विसर पडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आनलेल्या शेतमालातुन बाजार समितीला उत्पन्न मिळते. माञ बाजार समितीला याच शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे पहावयास मिळते.
बाजार समितीच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. माञ बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना या पासुन नेहमीच वंचित ठेवले जाते. संचालक मंडळाच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच फराळासाठी निमंञीत करुन फराळ दिला जातो ही वस्तुस्थिती आहे. बाजार समितीने शेतमालाचे उत्पन्न वाढवीण्यासाठी व आधिकाधिक शेतकऱ्यांना बाजार समितीकडे आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग असलेले मार्गदर्शक शिबीरे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केल्यास शेतकऱ्यां सोबतच बाजार समितीलाही फायद्याचे ठरणार आहे .शेतकरी व बाजार समितीच्याही उत्पन्नात वाढ होणार आहे असेही या पञकात श्री.मुरकुटे यांनी नमुद केले आहे.
*बाजार समिती ही शेतकऱ्यांचे हीत जोपासनारी संस्था आहे. केवळ नफा कमावणारी ही संस्था नाही. समितीला मिळालेल्या उत्पन्नातुन व्यवस्थापन खर्च वजा जाता उर्वरीत रकमेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठीच केला गेला पाहीजे. ठेव पावत्या करुन व्याजाचे उत्पन्न वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा ठेव पावत्यांवरील व्याजातुन बाजार समितीचे उत्पन्न वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना लाभांश रुपाने दिलासा द्यावा असे मत श्री.मुरकुटे यांनी नमुद केले आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

