shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता आपणच बदलू या !लेखांक नववा. दिनांक २२/११/२०२३


पिंपरी चिंचवड महापालिकेतील वृत्त आहे. महापालिका क्षेत्रातील  व्यवसायिक, हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट बार, बेकरी, बांधकाम व्यावसायिक अशा ११५ जणांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली असल्याचे कारण दाखवून हा दंड वसूल करण्यात आला.
 म्हणजे सरासरी तीन हजार रुपये दंड घेऊन जीवघेणे वायू प्रदूषण करणाऱ्यांना सोडून दिले. 

वायु प्रदूषण ही जीवघेणी समस्या आहे. लाखो लोकांच्या जिवाशी खेळ आहे. हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून वायू प्रदूषणास आळा बसणार आहे काय? वायू प्रदूषण नक्की कशामुळे झाले याचा विचार करून संबंधित आस्थापनांविरोधात कठोरात कठोर कारवाई केली तरच भविष्यात होणारे वायू प्रदूषण थांबेल . नाममात्र अर्थिक दंड वसूलीने प्रदूषण कदापि थांबणार नाही.
वरील वायु प्रदूषणा संदर्भात शासनाने केलेली कारवाई गंभीर स्वरूपाची आहे असे आपणास वाटते काय?

दुसरी बातमी आहे पुणे महापालिकेतील बेकायदेशीर होर्डिंग्ज मालकांना नोटीसा देण्याबाबत...जी गोष्ट बेकायदेशीर आहे हे महापालिकेला समजते त्यावर त्वरित कारवाई अपेक्षित असते. बेकायदा होर्डींग्ज पाडण्याबद्दल नोटीस देणे म्हणजे बेकायदेशीर होल्डिंग लावणाऱ्यांना मुदतवाढ देणे असेच होय.   म्हणजे कोणतिही बेकायदेशीर कृती करा, तुम्हाला नोटिसा येणार! मग तुम्ही त्याच्यावर निवेदन देणार. नंतर झालीच तर दंडात्मक कारवाई. कोणतीही गंभीर कारवाई नाही. हे असंच चालू राहणार असेल तर कायदा तोडण्याची प्रवृत्तीच बळवणार.
विचार करा! काय करू शकतो आपण?

देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, पुणे
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close