shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात मराठा बांधव आक्रमक

इंदापूर तालुक्यात मराठा बांधव आक्रमक

इंदापूर शहरात मेणबत्ती मोर्चाला विक्रमी प्रतिसाद

गंगावळण येथे मराठा आरक्षणसाठी जल आंदोलन
इंदापूर प्रतिनिधि:  इंदापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. ३१) रात्री मेणबत्ती मोर्चा काढला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासकीय भवन, श्रीराम चौक, नेहरू चौक, खडकपुरा, नगरपालिका, शहरातील पुणे-सोलापूर मार्गे बाबा चौकातून पुन्हा प्रशासकीय भवनासमोरील उपोषणस्थळी मोर्चाची सांगता केली. यामध्ये हजारो मराठा समाज बांधवांनी सहभाग घेत विक्रमी उपस्थिती लावली होती.
------------------------------------
 *गंगावळण येथे मराठा आरक्षणसाठी जल आंदोलन* 

गंगावळण (ता. इंदापूर)  मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दयावर  आक्रमक झाला असून,  आमरण उपोषण, तालुक्यातील विविध भागात साखळी उपोषणे सुरू आहेत. यामध्ये तालुक्यातील गंगावळण,
कळाशी येथील मराठा समाजाच्या  तरुणांनी आक्रमक होत वतीने साखळी उपोषण सुरू केली आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील हे  आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी सरकारकडून  ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजातील   गंगावळण येथे उजनी जलाशयात जल आंदोलन केले.  यावेळी मराठा समन्वयकांशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलिस यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेऊन बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा तरुणांनी निर्णय केला.
close