shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथे परमहंस सद्गुरू आनंदमाई पुण्यतिथी सप्ताह सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न..

देहरे (विशाल जेठे):-

नगर-शिर्डी रोडवरील नगर तालुक्यातील देहरे येथील आनंदमाई मठामध्ये परमहंस सद्गुरू आनंदमाईंच्या वर्ष ५३ व्या  पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले होते. 
  यावेळी आनंदमाईंच्या मठामध्ये रविवार दि.१९/११/२०२३ ते रविवार दि.२६/११/२०२३ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. 

या कार्यक्रमामध्ये हभप गणेश महाराज नवले ,हभप ॲड.शेषांगर बोबडे महाराज,हभप भागवताचार्य सौ.चैताली जाधव, हभप अमोल बडाख महाराज,हभप बाबा महाराज मोरे,हभप लक्ष्मण महाराज नांगरे,हभप सोमनाथ महाराज बारगळ या महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून दिनक्रमा प्रमाणे छान असे हरिकिर्तन संपन्न झाले.

हभप अर्जुन महाराज तनपुरे यांचे काल्याचे हरिकीर्तन...

रविवार दि.२६ रोजी काल्याचे कीर्तन संपन्न झाले. परमहंस आनंदमाईंची किर्ती अगाध व पावन आहे.आनंदमाईंनी जीवनामध्ये भगवंताची अखंड सेवा करत वटवृक्षाप्रमाणे शिष्यगणांचे जाळे विणले. त्यांची किर्ती सुर्य चंद्र असेपर्यंत राहील.असे यावेळी श्री क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान चे मठाधिपती हभप अर्जुन महाराज तनपुरे‌ यांनी काल्याच्या किर्तनाच्या वेळी आपल्या सुमधुर वाणीतून स्पष्ट केले.


 यावेळी अनेक भाविकांनी पवित्र अन्नदान केले. 
यावेळी परमहंस सद्गुरू आनंदमाईं संस्थानच्या भाविकांनी आठ दिवस चोख व्यवस्था ठेवली होती.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी मांदियाळी जमली होती. या कार्यक्रमाला प्रकाश धनवटे,बि.जी.लाडगे.हभप ढोकणे महाराज,डावरे साहेब,
दत्तात्रय धनवटे,हरिकिशन धनवटे, दत्तात्रय कुसळकर, मेघनाथ धनवटे, सागर धनवटे, संजय पवार, जगन्नाथ कुसळकर,बाळू विटकर, किसनराव धनवटे,सागर धनवटे प्रल्हाद कुसळकर, मयूर धनवटे, नीरज जेठे व परमहंस सद्गुरू आनंदमाईं संस्थानच्या भाविकांनी विशेष सहकार्य केले..
close