शेवगांव प्रतिनिधी:
शेवगाव तालुक्यातील हातगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा हातगांवच्या केंद्रप्रमुख पदी बाबासाहेब पुंजा पिलगर यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. गुरूवारी ( दि. २३ ) त्यांनी केंद्रशाळा हातगांव येथे हजर होऊन केंद्रप्रमुख पदाचा पदभार स्विकारला.
अहमदनगर जिल्हा परिषदेची सेवाज्येष्ठतेने केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया नुकतीच पार पाडली.या प्रक्रियेत श्रीरामपूर तालुक्यातील मुख्याध्यापक बाळासाहेब पिलगर यांची हातगांव येथे केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. हातगांव केंद्रांतील प्रभुवडगांव शाळेचे ज्येष्ठ मुख्याध्यापक सखाराम सातपुते , हातगांवचे मुख्याध्यापक गणेश पुरूषोत्तम तसेच शाळेतील शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी बोलताना केंद्रप्रमुख पिलगर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. केंद्रातील शिक्षकांनी सर्मपित भावनेने आपले कार्य करावे त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.
सातपुते म्हणाले, हातगांव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक अध्ययन - अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत प्रयत्न करतात. शाळेची विविध माहिती वेळेवर देणे यासाठी केंद्रप्रमुखांना सर्व मुख्याध्यापक सहकार्य करतील असे त्यांनी सांगीतले.
यावेळी बाळासाहेब वाघुंबरे, संजीवन शेलार, संजय भालेकर, हरिभाऊ सरदार, आंबादास कांबळे, विष्णू वाघमारे, मनिषा हरेल आदी शिक्षक उपस्थित होते.
हातगाव ( ता. शेवगाव ) येथे केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर यांचे स्वागत करताना ज्येष्ठ मुख्याध्यापक सखाराम सातपुते व गणेश पुरूषोत्तम आदींसह शिक्षकवृंद
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

