श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर नगरीत श्रीराम अक्षता मंगाल कलश रथयञा उत्साहात संपन्न झाली.पंचक्रीशितील महिला, युवक,राममंदिराचे कारसेवक, भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
श्रीराम अक्षदा मंगल कलश रथयाञेची सुरुवात बाजारवेशीतील हनुमान मंदिरापासून झाली.सवाद्य निघालेल्या याञेचे श्रीरामप्रभूंचा खास सजावट केलेला रथ हे खास आकर्षण होते.गावातील मान्यवर, भाविक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी हा श्रीराम रथ भक्तीभावे ओढला.रथयाञेत ग्रामस्थ,नागरिक. ,कारसेवक, महिला, युवक,भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्रीरामाच्या घोषणे वातावरण मंगलमय झाले होते.महिलांनी याञेच्या स्वागतासाठी रस्त्यावर,अंगणात रांगोळ्या सजवून मांगल्यमय वातावरण निर्माण केले.तर जे.टी.एस. हायस्कूलच्या लेझिम पथकाने व महिला भजनी मंडळाने याञेला चैतन्यरुप लाभले.याञेत युवक,युवतींचा सहभाग लक्षणिय होता. बेलापूर हे श्रारीममंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे जन्मगाव असल्याने या याञेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.अतिशय भक्तीभावे व मंगलमय वातावरणात निघालेल्या या याञेचे ग्रामस्थ,विविध संस्था आदिंनी पुष्पवृष्टी करुन ठिकठिकाणी स्वागत केले. हरिहर केशव गोविंद मंदिरात रथयाञेची सांगता झाली.
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

