shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृतवाहिनी प्रवरा नदीची तीन दिवसाच्या परिक्रमेसाठी भाविक रवाना


श्रीरामपूर प्रतिनिधी:
अनादी काळापासून अमृत घेवून वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीन दिवसाच्या मोटारसायकल परिक्रमेला तालुक्यातील बेलापूर येथील श्री हरिहर केशव गोविंद बनातून शनिवारी (दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी) उत्साहात सुरुवात झाली.        

                      अमृतवाहिनी प्रवरेला प्रदिर्घ पौराणिक परंपरा आहे.विष्णू देवाच्या पदस्पर्शाने जन्म घेतलेली प्रवरामाई रतनगड येथे उगम पावून कायेगांव टोके येथे गोदामाईत विलिन होते.प्रवरामाई व हरिहरांनी ञिपूरासूराच्या नाशासाठी जप केला. देवदेवतांनीही आपापले शिवलिंग प्रवराकाठी स्थापले.अशी पौराणिक अख्ययिका आहे.                                                            अशा या पविञ प्रवरामाईची तिसरी परिक्रमा शनिवारी सुरु झाली.केशव गोविंद बन- कोल्हार- अमृतेश्वर-अगस्ती आश्रम - कायगांव टोके- देवगड - नेवासा ते केशव गोविंद बन येथे सोमवार (ता.१८) रोजी परिक्रमेची सांगता होणार आहे.


*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close