भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील चर्मकार व्यावसायीक बाबुलाल ठाणसिंग पवार (वय-६७) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात दोन भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परीवार आहे. मुळ मालेगांव तालुक्यातील शेरूळ येथील बाबुलाल पवार हे भोकर येथे अनेक वर्षापासून स्थायीक झालेले होते. येथील कोल्ड्रींक व्यावसायीक सतीश पवार व राहुल पवार यांचे ते वडील होत. तसेच नेवासा येथील शिक्षक हरीभाऊ आहीरे व भोकर येथील ग्रामपंचायत कर्मचारी बनीचंद, दिलीप व प्रकाश देवीचंद आहीरे यांचे ते मेहुणे होत.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

