वालचंदनगरच्या कामगारांनी मानले आमदार दत्तात्रय भरणे यांचे आभार.
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा इंदापूर : वालचंद्रनगर येथील कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत व कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी १२ डिसेंबर रोजी विधिमंडळात
प्रश्न उपस्थित केला होता. याबद्दल आज या कंपनीतील कामगारांनी श्री भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन श्री भरणे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.
विधिमंडळात आमदार दत्तात्रय भरणे यांनी कामगारांच्या हितासाठी तत्काळ कंपनी प्रशासन कामगार मंत्री व पालकमंत्री यांची बैठक कामगारां समवेत बैठक घ्यावी. कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी यावेळी विधिमंडळात केली.यावर लवकरच बैठक घेतली जाईल. असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नाबाबत विधिमंडळात आमदार भरणे यांनी आवाज उठवल्याने तालुक्यातील जनतेतून व कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे.हे कामगार समाधान व्यक्त करून थांबले नाहीत तर आज भरणेवाडी येथील निवासस्थानी जाऊन श्री भरणे यांचा सत्कार केला. व आभार मानले. यावेळी श्री भरणे यांनी जनतेचे व कामगारांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्यच आहे. या पुढील काळातही आपण जनता व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. असेही यावेळी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील उपस्थित होते.

