प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
देशातील शेतकऱ्यांना 2019 या कालावधीत पी.एम. किसान योजनेतील शेतकऱ्यांना मिळणारी शेतकरी सन्मान निधी 2023 मध्ये तब्बल 67% शेतकऱ्यांची संख्या कमी झाली म्हणजे 2019 च्या तुलनेत आज केवळ 23% शेतकऱ्यांनाच शेतकरी सन्मान मिळत आहे याच कारण काय ? असा प्रश्न राज्यसभेच्या खा. रजनीताई पाटील यांनी विचारला असता केंद्रीय मंत्र्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
या प्रश्नावर त्यांनी आक्रमकपणे मांडून धारेवर धरले शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहात मांडल्याने शेतकऱ्यांच्या सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल .यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

