प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
धारूर तालुका हा विविध क्षेत्रात मागास तालुका म्हणून नेहमी चर्चेत आसतो.त्याच प्रमाणे प्रशासकीय कामात ही मागेच आसतो. यामध्ये धारूर पंचायत समिती सर्वात पुढे आहे या ठिकाणी वडवणी येथे कार्यरत असणारे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्याकडून धारूर तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या नागरिकांच्या सर्व अपेक्षा नागरगोजे हे पूर्ण करतील या विश्वासाने धारूर येथील गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेताच त्यांचे स्वागत करत प्रलंबित कामांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
धारूर पंचायत समिती मध्ये सतत अनेक पदे रिक्त आसतात.धारूर येथे पदस्थापना असलेले अनेक अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्ती करून घेतात जे कार्यरत आसतात ते वेळेवर ॲाफीस मध्ये बसत नाहीत या मुळे धारूर तालुक्यांतील जनता त्रस्त आसते.
गट विकास अधिकारी कांबळे यांची धाराशिव येथे बदली झाल्या मुळे रिक्त पदावर माजलगाव च्या गट विकास अधिकारी श्रीमती माने यांच्या कडे पदभार देण्यात आला होता.परंतू श्रीमती माने यांच्या कडे माजलगाव सारख्या मोठ्या तालुक्याचा कारभार व धारूर ते माजलगाव पन्नास कि.मी अंतरावरून कारभार करणे त्यांना अशक्य असल्यामुळे व पुर्वी कांही दिवस पदभार असतानाच्या अनुभवामुळे तालुक्यांतील पदाधिराऱ्यांच्या विनंती वरून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी वडवणी येथे कार्यरत असलेल्या विठ्ठल नागरगोजे यांना धारूर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.विठ्ठल नागरगोजे यांनी घारूर गट विकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे,माजी सभापती हनुमंत नागरगोजे,माजी उप सभापती प्रकाश कोकाटे,सामाजीक कार्यकर्ते सादेक ईमानदार,पत्रकार संदिपान तोंडे,परमेश्वर राऊत,सचिन थोरात,प्रा.तोंडे,बालासाहेब मायकर,भागवत शिनगारे,सुरेश अंडील,बालासाहेब चोले,युवराज मुंडे तसेच सरपंच,ग्रा.प.सदस्य व नागरीकांनी स्वागत करून घारूर तालुक्यांतील विविध योजनांचे प्रलंबित कामे एका महिन्यात मार्गी लावावेत अन्यथा जन आंदोलन करू असे लेखी निवेदन नव नियुक्त गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना दिले आहे.
आपणास प्रशासकीय कामाची आवड असून कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने जनतेच्या हिताची प्रलंबित कामे नियमानुसार विना विलंब करू असे अश्वासन विठ्ठल नागरगोजे गट विकास अधिकारी धारूर यांना सत्कार प्रसंगी दिले.

