-पै.सौरभ जाधव "भोजडे श्री" तर पै.श्याम मुर्तडक "भोजडे केसरी'' विजेते
*भोजडे कुस्ती स्पर्धेत अत्यंत चूरशीच्या लढती*
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ग्रामदैवत राजा विरभद्र यात्रौत्सवातील मुख्य आकर्षण आणि तीन दिवशीय यात्रेतील आजच्या शेवटच्या दिवशी झालेल्या एकूण कुस्ती स्पर्धा अत्यंत चूरशीच्या झाल्या. यात पंचक्रोशीतील अनेक पैलवानांनी रोख बक्षिसे पटकावली. यावेळी शेवटच्या साखळी कुस्ती स्पर्धेतील विजेते पै. सौरभ जाधव यांना "भोजडे श्री" तर पै.श्याम मुर्तडक यांना "भोजडे केसरी" पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
भोजडे ग्रामपंचायत, यात्रा कमिटी आणि समस्त भोजडे ग्रामस्थांच्या वतीने आज अखेरच्या दिवशी भव्य कुस्ती स्पर्धा भरविल्या होत्या. यात पंचक्रोशीतील अनेक मल्लानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी कोपरगाव येथील पै. कु. साक्षी लोणारी या मुलीने 1001 रुपयाचे रोख बक्षिस पटकावले.
यावेळी भोजडे नं दोन सोसायटी, Sai Ekta Foundetion Shirdi आणि Vasantdada Multistate वसंतदादा मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक चेअरमन कै. सिताराम पाटील सिनगर आणि कै. प्रविण भाऊ गोंदकर पाटील यांच्या स्मरणार्थ साखळी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी पंचक्रोशीतुन पै.सुनिल खपके, पै.भगवान लोणारी, पै.संकेत जाधव, पै.ज्ञानेश्वर महाले, पै.युवराज ढमढेरे, पै.जुबेर शेख, पै.अंकूश कसाळे, पै.श्याम मुर्तडक यांच्यात अतिशय चूरशीच्या लढती झाल्या. सुरवातीला अनेक लहान मुलांनी कुस्तीचा मनमुराद आनंद घेत कुस्ती फड गाजवला. यानंतर मानाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्यात.
यावेळी साखळी स्पर्धेचे संयोजक भोजडे नं.2 सोसायटीचे चेअरमन मुकुंदराव पा. सिनगर, युवानेते चारुदत्त पा. सिनगर, लोकनियुक्त सरपंच सुधाकर पा. वादे, उपसरपंच दिलीपराव पा. सिनगर, माजी उपसरपंच वाल्मिकराव पा. सिनगर, अजितराव पा. सिनगर, साई एकता ग्रुपचे मिनलराव पा. गोंदकर, सोसायटीचे संचालक दिपकराव पा. धट, विक्रम पा. सिनगर, अच्युत पा. सिनगर, शंकरराव पा. सिनगर, संतोष पा. सिनगर, नारायण पा. सिनगर, खंडू पा. सिनगर, दत्तात्रय पा. सिनगर, गणेशराव पा. वाळुंज, धोंडीराम पा. धट, गोरख अण्णा गलांडे, बाबासाहेब मंचरे, सखाराम पवार, अविनाश मोरे, सचिन मंचरे, महेश आहेर, संदीप गायधने, किरण वाबळे यांच्यासह कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

