अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने मांतग समाज व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व रोजगार व स्वयंरोजगार साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी सामाजिक न्याय भवन येथे मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मांतग समाज व तत्सम जातीतील कुटुंबांच्या उन्नतीसाठी शासन तसेच महामंडळाच्यावतीने अनेकविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आले.
मेळाव्यात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक प्रणिता बोराडे यांनी केले. कार्यक्रमास मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक व लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

