shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विकसित भारत संकल्प यात्रेची नवनागपूर, तालुका नगर येथे कार्यक्रमाचा तहसीलदार शिंदे व पं.समितीचे गटविकास अधिकारी सोनकुसळे यांच्या शुभहस्ते शुभारंभ.

विकसित भारत संकल्प यात्रेची नवनागपूर, तालुका नगर येथे  कार्यक्रमाचा तहसीलदार शिंदे  व पं.समितीचे गटविकास अधिकारी  सोनकुसळे यांच्या शुभहस्ते शुभारंभ.
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 विकसित भारत संकल्प यात्रेच्या वेळी प्रत्येक अधिकाऱ्यांनी शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती देणे अनिवार्य आहे असे नगर तालुक्याचे तहसीलदार शिंदे गट विकास अधिकारी सोनकुसळे  कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी अधिकाऱ्यांना  म्हणाले.
यावेळी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके ,पंचायत राजचे  तालुकाध्यक्ष अंबादास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर काकडे  ,तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती  सुडके  ,गटशिक्षणाधिकारी  जाधव, पंचायत समिती बांधकाम विभाग  अभियंता 
 खेडकर  ,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 या कार्यक्रमाला नव नागपूर ग्रामपंचायत उपसरपंच सौ संगीताताई सप्रे ,सदस्य आप्पासाहेब सप्रे ,अमोल सप्रे, गोरख गव्हाणे, हेमा चव्हाण, मंगलताई गोरे, सत्यभामा डोंगरे तसेच ग्राम विकास अधिकारी संजय मिसाळ, कामगार तलाठी तरटे . मंडळ अधिकारी जायभाय तसेच तालुक्यातून आलेले विस्तार अधिकारी खाडे , तुपे , माळी  सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी शिक्षण विभाग विस्ताराधिकारी कृषी सहाय्यक गिरी मॅडम तसेच गावातील ग्रामस्थ आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका जि प शाळा सर्व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी बचत गटाचे सर्व महिला तसेच शाळेतील विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते .

close