कौठळी शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा..
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ६ डिसेंबर- जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.वाचना नंतर शाळेतील शिक्षक अमित भोंग व आरती गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ मुलांना दाखविण्यात आला.यावेळी भारत ननवरे सर व पालक उपस्थित होते.

