अहमदनगर जिल्ह्यामधील देहरे गावचे रहिवासी प्रा. सुहास बाबासाहेब पाखरे यांना 2020 मध्ये कोरोनाच्या भयंकर काळात गुजरात मधील साबरमती विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली, कोरोनाच्या भयंकर काळात खूप अशा वाईट घटना सर्वांनीच पहिल्या डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा आनंद त्यांनी त्या काळात साजरा नाही केला,
आज तब्बल तीन वर्षांनी त्यांना डॉक्टरेट पदवीमुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक पदावर बढती दिली ते सध्या पुणे येथील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलातील एमबीए विभागात कार्यरत आहेत, त्यांच्या या यशामागे त्यांच्या मागील पंधरा वर्षाच्या शैक्षणिक कार्यकाळातील सर्व मित्र परिवार, सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, परिक्रमा व अडसूळ शैक्षणिक संस्थेतील मित्रपरिवार, नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पोपटराव सुके, ग्रुप डायरेक्टर श्री. सागर सुके, एमबीए व एमसीए चे संचालक डॉ. तानाजी दबडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व देहरे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य मंडळ व आमदार निलेश लंके प्रतिष्ठान चे सर्व सहकारी व सर्व पत्रकार मित्र मंडळ यांच्या सहभाग आहे असे डॉ. सुहास बाबासाहेब पाखरे यांनी सांगितले.

