पेन्शनधारकांचे १२ डिसेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलनप्रसंगी खा.सुप्रिया सुळे यांचे आश्वासन*
नवी दिल्ली - विशेष प्रतिनिधी:
केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा २०२४ च्या जाहीरनाम्यात रु ९०००/-अधिक महागाई भत्ता असा पेन्शनवाढीचा उल्लेख राहील असे खा.सुप्रिया सुळे यांनी १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली च्या जंतर मंतर वर पेन्शनरांच्या झालेल्या देशव्यापी आक्रोश आंदोलनाप्रसंगी जाहीर केले.
या मेळाव्यात प्रकाश येंडे,[नागपूर] प्रकाश पाठक, बाबुराव दळवी, पुंडलिक पांडे, भीमराव डोंगरे, सर्जेराव दहिफळे, सुभाष कुलकर्णी यांची भाषणे झाली. मेळाव्यात अनेक संघटनांचे दहा हजार पेन्शनधारक सहभागी झाले होते. केंद्र सरकारकडून पेन्शनरांच्या पेन्शनवाढ आदी प्रश्नांचा योग्य निर्णय न घेतल्यास सत्ताधारी पक्षाच्या विरोधात २०२४ मध्ये मतदान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. म.राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर गेली १२ वर्षे लढा देत आहे, तरी पेन्शनवाढ करण्यात आली नाही.२०१२ या वर्षी खा.भगतसिंह कोशियारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने रु ३०००/- पेन्शनवाढ करावी अशी शिफारस केली परंतु केंद्र सरकारकडून २०१४ या वर्षी केवळ फक्त रु १०००/- मंजूर करण्यात आले.ही पेन्शन अत्यल्प असून दैनंदिन गरजा भागविता येत नाही. दि २० एप्रिल २३ रोजी व २९ ऑगस्ट रोजी लोकसभा सेक्रेटरी एटपार्लमेंट हाउस दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांच्याकडून पेन्शनधारकांच्या मागणीसाठी पेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रु ३०००/- ची शिफारस जर अमलात आणली असती तर आज दरमहा ८ ००० ते ९०००/-रु पेन्शन मिळाली असती, त्यासाठी १२ वर्षे आंदोलने केली मात्र पदरात काही आले नाही.पंतप्रधान यांनी अनेकवेळा मोठमोठ्या घोषणा केल्या, शेतकरी, कामगार, आदींना भरघोस अनुदान देण्याच्या देखील घोषणा केल्या परंतु लाखो रु. जमा करणाऱ्या पेन्शनधारकांना दरमहा ८०० ते १५०० पर्यंत पेन्शन दिली जाते.हे किती अन्यायकारक आहे.असा संतापही याठिकाणी पेन्शनधारकांकडून व्यक्त केला जात आहे.
मेळाव्यास अध्यक्ष एस एल दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी,उपाध्यक्ष बाबुराव दळवी, अंकुशराव पवार, विठ्ठलराव पावसे,विलास दशपुते, हरिभाऊ खाटिक,आदी उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* : स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

