खानदेश मराठा मंडळाच्या वतीने वधु वर पालक परिचय मेळावा संपन्न
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू वर पालक परिचय मेळावा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा दिनांक ०३.१२.२०२३ रोजी संपन्न झाला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनू पगार, उपाध्यक्ष गुलाबराव सदाशिव पाटील उपाध्यक्ष .सयाजीराव रामराव पाटील,
सचिव .प्रदीप दामोदर शिंदे,
खजिनदार श्भास्कर दगडू पाटील,
सहसचिव अनिल फकीरा सावंत, सहखजिनदार:- सिसोदे जयवंत विनायक
संचालक.मिलिंद भास्कर पाटील, .संजय भागवत पाटील,
.सुरेश भगवान पाटील, .कृष्णराव चैत्राम अहिरराव आणि मार्गदर्शक कमिटी मधील .संतोष दामोदर पाटील,.भिकनराव दयाराम पाटील,
.माधव बाबुराव पवार. आणि जेष्ठ उद्योजक हंबीरराव चव्हाण, सुनील जाधव, डॉ समीर पाटील, दिलीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते मंडळाचे सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा अल्प परिचय अनिल सावंत यांनी केला. माजी अध्यक्ष बी डी पाटील यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश भदाणे, नामदेव ढाके यांच्या हस्ते वधू वर सूची प्रकाशन करून कार्यक्रमाला उद्देशून मार्गदर्शन केले. कोवीड काळात रुग्णवाहिकेचे महत्व किती होते हे त्यावेळेस आपण सर्वांनी बघितले आहे. त्यामुळे आपल्याला तिची गरज वाटू नये परंतु गरज वाटल्यास हक्काची रुग्णवाहिका आपल्या मंडळाकडे असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
मंडळाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यात रुग्णवाहिका ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर देण्यात येईल.
वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन मिलिंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भगवान पाटील यांनी केले.आणि कार्यक्रमाचे आभार एस आर पाटील यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी समाजात असलेल्या चालीरीतीमध्ये लग्नाच्या अगोदर जे प्री-वेडिंग शूटिंग केले जाते. आणि ज्यात नको गोष्टी लोकांना दाखविल्या जातात अशा लग्नांना समाजाने सार्वजनिक बहिष्कार टाकावा असे सुचविले.
पालकांनी कर्ज काढून देखाव्यासाठी खूप मोठा लग्न करू नये त्या ऐवजी त्यात वाचलेला पैसा हा त्यांच्या पुढील संसारी गरजा भागवण्यासाठी उपयोगात आणावे असे सुचविले.
कार्यक्रम संपताना सर्वांनी सुरुची भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत आलेल्या पालकांशी एकमेकांशी चर्चा करण्यास पूरेशी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

