shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लढवय्या पॅन्थर रविंद्रदादा जाधव यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा

वजीरभाई शेख - पाथर्डी
ओझर - अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया चे प्रदेश उपाध्यक्ष तर मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय सचिव रविंद्रदादा जाधव या लढवय्या नेता यांचा  वाढदिवस २ डिसेंबर रोजी बुध्दविहार प्रांगण मिलिंद नगर ओझर (मिग) जि. नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात फटाक्यांच्या आतषबाजीत करत थाटामाटात संपन्न झाला. प्रथमतः भगवान गौतम बुध्द व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदनगिताने कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रणव कौटुंरवार प्रसुत स्वरसाज म्युझिकल्स आँक्रस्ट्रा चा कार्यक्रम संपन्न झाला. 

या प्रसंगी निफाड तालुका नाशिक शहर व जिल्हा आणि महाराष्ट्रभरातून रिपाई चे व  अ.आ.नि.स.चे असंख्य पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते, तर या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी व हितचिंतकांनी राष्ट्रपुरुषांचे पुस्तके व गुलाबपुष्प देवुन शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांनी केले. तर तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ साळवे, ओझर चे माजी सरपंच हेमंतभाऊ जाधव, वसंतराव वाघ, प्रदीपभाऊ आहीरे, कु. श्रध्दा शिंदे, वैशालीताई जाधव, संजय दोंदे, संदीप भालेराव, राजेंद्र गांगुर्डे, सुरेश डांगळे, रफीक सैयद,संदीप गांगुर्डे, विजय आहीरे, सुदेश गांगुर्डे, नितीन खडताळे, प्रदीप पगारे, संजय मोहीते, रविराज सोनवणे, मनिषा पवार,मनिषा म्हसदे, राधा क्षिरसागर, वनिता काळे, फर्जाना शेख, संगिता पवार, रवींद्र भंडारे, अशोक गांगुर्डे, दिलीप लोखंडे, अँड.विजय कुलकर्णी, संतोष सोनवणे, शामराव कदम, मधुकर गवारे, रवींद्र बागुल, धर्मेद्र जाधव, दादाभाऊ केदारे,  बाळा पठाडे, विनोद भोसले, कमलेश डांगळे,  आदींनी शुभेच्छा दिल्या.  सुत्रासंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले तर आभार शशीभाऊ जाधव यांनी मानले. वाढदिवसानिमित्त कार्यक्रम यशस्वीतेसाठी चार्वाक जाधव, सागर जाधव, कृणाल जाधव, भुषण जाधव, शशांक जाधव, तेजस कटारे, राहुल जाधव, मनोज जाधव, विजय ढेंगळे, प्रवीण जाधव, संदीप ढेंगळे, महेश जाधव, भागवत जाधव, उतम जाधव, महेंद्र जाधव, आदींनी परिश्रम घेतले.


पत्रकार राजु मिर्जा
(नाशिक विभाग - ब्यूरो चिफ)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close