shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांगांनी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असुन जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगानी योजनेच्या लाभासाठी ४ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि‍ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगानी https://evehicleform.mshfdc.co.in या लिंकद्वारे ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी  १०,०० वाजेपर्यंत अर्ज करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी-स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close