ओबीसी आणि मराठा समाजाकडून एकत्र येत महाराष्ट्राला एक नवीन संदेश.
इंदापुरातील आज होणारा विराट मोर्चा रद्द
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेक प्रकरणानंतर राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलने होत अशांतता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केल्याने इंदापूरमधून सुरू झालेला ओबीसी विरुद्ध मराठा वादावर आता पडदा पडला आहे. यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाकडून एकत्र येत महाराष्ट्राला एक नवीन संदेश दिला आहे. राज्यात शांतता व सलोखा राहावा म्हणून महसूल व पोलिस प्रशनासाने पुढाकार घेत इंदापूरमध्ये सकल ओबीसी व सकल मराठा समाजाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. मराठा आंदोलकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत ओबीसींनाही संघर्ष होऊ नये, असे आवाहन करीत यावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.

