श्रीरामपूर प्रतिनिधी:
दि.२६ जानेवारी रोजी तालुक्यातील उंदिरगांव येथे दुपारी २ वाजता ग्रामसभा पार पडली.सर्वप्रथम ग्रामसेवक श्री. डौले यांनी ग्रामसभा इतिवृत्तांत वाचन केले,त्यानंतर सागर गिऱ्हे या ग्रामस्थाने गावामध्ये वेळेवर पाणी येत नाही,तसेच उंदिरगाव पंचक्रोशीला जोडणारे उंदिरगांव - खैरी, उंदिरगाव -गोंडेगांव, उंदिरगाव - खानापुर या रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परीषद तसेच आमदार खासदार यांना त्वरित पाठवावे तसेच शासनाकडुन पशुपालकांना मिळणारे अनुदान आणि विविध योजनांसाठी इअर टॅगींग तसेच पशुधन कार्ड साठी आपल्या गावामध्ये विलंब होत असल्याची तक्रार केली,
यासोबतच आपल्या उंदीरगावामध्ये नवीन पशुवैद्यकीय उपकेंद्र व्हावे व महीलांसाठी कमीत कमी ४ ठिकाणी बाथरुम तसेच टॉयलेट ची व्यवस्था व्हावी, इतर गावांमध्ये अद्ययावत लायब्ररीसाठी भरीव निधी उपलब्ध होतो, मग आपल्या गावाला का नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशी खंत व्यक्त केली.
त्याचप्रमाणे दिवसेंदिवस गावात वाढलेल्या चो-या बघता, याआधीच केलेली सीसीटीव्ही तसेच स्ट्रीट लाईट का बसवले नाही असा प्रश्नही उपस्थित केला. नियमीत पाणीपट्टी भरणा-या ग्रामस्थांना आरओचे पाणी मोफत मिळण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी देखील यांनी करत ग्रामपंचायत पदाधिका-यांना धारेवर धरले.
या सर्व मागण्यांना ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पंडीत तसेच तेथे उपस्थित ग्रामस्थांनी पुर्णपणे पाठींबा दिला.
त्यानंतर डाॅ. राजगुरु यांनी वैद्यकीय योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतीभाताई गोलवड या होत्या.,या ग्रामसभेला मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे तसेच संचालक विरेश गलांडे,माजी उपसरपंच रमेश गायके तसेच बाळासाहेब निपुंगे सदस्य स्वप्नील पंडीत, गिरीष परदेशी, उज्वला शेळके, प्रकाश ताके,रामचंद्र आव्हाड,सुनिल ताके, मुन्नाभाई इनामदार,विरेश बोधक,अविनाश काळे, आदित्य बारहाते,आप्पा डोखे,हाजुभाई सय्यद तसेच इतर ग्रामस्थ तसेच महीला भगीनी उपस्थित होत्या.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

