shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

७५ वा प्रजासत्ताक दिन जेबिव्हीपी मध्ये उत्साहात साजरा*

*७५ वा प्रजासत्ताक दिन जेबिव्हीपी मध्ये उत्साहात साजरा* 
इंदापूर :-  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
    प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल , विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
          प्रजासत्ताक दिन हा आपल्या भारतातील सुवर्ण दिन असून हा आपला राष्ट्रीय सण आहे.या मंगलमय दिनाची प्राप्ती हजारो देशभक्ताच्या बलीदानातून झाली.प्रजासत्ताक दिनानिमित्त शैक्षणिक संकुलामध्ये जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे. श्रीमंत ढोले सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.राष्ट्रगीत, राज्यगीत,झेंडागीत, कवायत , संचलनाचे सादरीकरण केले ;तसेच प्रशालेतील छोट्या वक्त्यांनी आपल्या देशाबद्दल असणारा अभिमान व स्वाभिमान मराठी , इंगजी, हिंदी भाषेमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व्यक्त केले.  व  मान्यवरांच्या हस्ते जय भवानीगड दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकाला जय भवानीगड दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
           विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक ऐक्य, समता ,बंधुता, एकजुटीने, एकदिलाने राहण्याचे  बाळकडू प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे बदल करून एक सामाजिक क्रांती करावी व आपले आचार विचार बदलून आपला विद्यार्थी जगाच्या पातळीवर कुठेही गेला तरी तो विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे. स्त्री सुशिक्षित राहायची असेल तर महाराष्ट्राच्या मातीसारखं कणखर दगडासारखं झालं पाहिजे. रामराज्य ,सुराज्य घडवण्यासाठी कायद्याचे पालन, चांगली सुव्यवस्था ,आपली संस्कृती जपावी.त्यासाठी प्रत्येकाने  खारीचा वाटा उचलून  आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करून, चांगली सुव्यवस्था राखली पाहिजे. चांगले खेळ खेळून ,मनाचे शारीरिक स्वास्थ जपून एक चांगले सुराज्य निर्माण करावे.भारतातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या नागरिकाची ही एक जबाबदारी आहे आपलं तन, मन ,धन एकत्र करून संस्कारक्षम सुजान नागरिक घडवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने प्रयत्न करावा तेव्हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिखित स्वरूपात भारताला दिली ती खऱ्या अर्थाने अमलात आणली जाईल.  मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा योग्य कामासाठी सदुपयोग करावा आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी  तसेच सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी शालेय शिस्त, कला ,स्पर्धा, अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच स्वतःची शोधकवृत्ती, कल्पकता, विकसित करणे गरजेचे आहे. असे  संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे  श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच  चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव. हर्षवर्धन खाडे सर,संस्थेचे प्रमुख  सल्लागार. प्रदीप गुरव सर, संस्थेचे विश्वस्थ पृथ्वीराज  ढोले ,हृषीकेश   ढोले, संस्थेचे  जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर सर ,संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद  ,विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक   यांच्या  उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीमंत गुरव सर व  अनिकेत माने सर यांनी केले.
close