shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते खोरोची येथे आज होणार २० कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन.

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते खोरोची येथे आज होणार २० कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन. 

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील खोरोची या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २० कोटी २४ लाख रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन हे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दि. २७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. याच दरम्यान सायंकाळी ७.०० वाजता जाहीर सभासुद्धा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली. 
आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास निधीतून खोरोची या भागातील रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. चांगल्या दर्जाचे रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.



यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, माजी  पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, हेमंत पाटील, संग्राम पाटील, दिपक जाधव, नवनाथ रुपनवर, दत्तात्रय घोगरे, साधनाताई केकाण, निर्मलाताई परदेशी, बाळासाहेब करगळ, अभिजीत रणवरे, बापूराव शेंडे, शुभम निंबाळकर व इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे समस्त ग्रामस्थ खोरोची यांच्याकडून करण्यात आले आहे.
close