जि. प. शाळा बोंद्रेवस्ती शाळेत भरला आनंदी बाजार
इंदापूर : दि. १३/०१/२०२४. आज जि. प. शाळा बोंद्रेवस्ती या शाळेत बालचमूचा आनंदी बाजारच भरला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे यांचे शुभहस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची उपक्रमाची सुरवात करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बड़े सर व उपशिक्षक श्री कुंभार सर यांनी 'आनंदी बाजार था उपक्रमाचे महत्व उपस्थित सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी यांना सांगितले . बाजार भरविल्यामुळे विद्यार्थी व पालकांना खुप आनंद समाधान वाटले. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजार काय असतो याचे ज्ञान व अनुभव मिळाला. मकरसंक्रातीच्या अगोदर बाजार भरवला यामुळे पालकांनी, ग्रामस्थांनी भाजीपाला, भोगीचे, संक्रांतीचे साहित्य खरेदी केली.

