कै. निखिल उत्तम तिकुटे यांच्या स्मरणार्थ वडापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वह्या व पॅड वाटप.
इंदापूर: कै. निखिल उत्तम तिकुटे राहणार चाहूरवस्ती भांबुर्डी( ता. माळशिरस जि. सोलापूर) वय वर्ष २१ यांचे दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ वडापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे व डॉ. करुणा नंदराज चंदनशिवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व पॅड वाटप करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
निखिल तिकुटे हे कृषी पदवी च्या तिसऱ्या वर्षाला ॲग्री कॉलेज कडेगाव सांगली या ठिकाणी असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने पुढे ते भावी शासकीय अधिकारी होऊ शकले असते परंतु काळाच्या पडद्याआड गेल्याने ते स्वप्न अपुरे राहिले . हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांचे मामा नंदराज चंदनशिवे व मामी डॉ. करुणा चंदनशिवे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये उन्नती व्हावी म्हणून वह्या, पॅड वाटप केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधुरी कदम, मा. उपसरपंच विठ्ठल कदम, महादेव चंदनशिवे,सत्यवान पासगे,मुख्याध्यापिका मनीषा मोरे मॅडम, प्रतिभा गरकल मॅडम, श्यामसुंदर माने सर व विद्यार्थी उपस्थित होते .
नंदराज चंदनशिवे व करुणा चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये निखिल उत्तम तिकुटे सोशियल फौंडेशन माध्यमातून भविष्यात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचे त्यांनी संकल्प केला.

