पाथर्डी प्रतिनिधी
आज दिनांक २४ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शास्त्रीनगर येथे जनपरिवर्तन ट्रस्ट अहमदनगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन बालगोपालांच्या संगतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. लक्ष्मण बोरुडे यांनी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे ते मिळवल्यानंतर प्रगती निश्चितच आहे असा संदेश दिला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शास्त्रीनगरचे मुख्याध्यापिका वांढेकर मॅडम आणि शाळेतील जोशी सर, आल्हाट सर, सोनवणे सर, ढोले मॅडम, झिरपे मॅडम, चौधरी मॅडम, भापकर मॅडम, गायकवाड मॅडम, वडते मॅडम शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार मंडळ सदस्य श्री सनी शिंदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जनरल मॅनेजर डॉ. सी एम पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने शाळेला शुभेच्छा भेट देण्यात आली आणि बाळ गोपाळ विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने बोडखे सर यांनी संस्थेचे सर्व बाळगोपाळांच्या वतीने आभार मानले.
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

