श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील, बेलापूर कंपनी हायस्कूल च्या 1986 -87 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 18 फेब्रुवारीला आपल्या शाळेतच स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे यातील बरेच विद्यार्थी बालवाडी ते दहावीपर्यंतचे प्रत्येक वर्गातील सोबती होते. सुरुवात झाली ते शाळेची घंटा वाजवून !सर्वप्रथम १९८६-८७ बॅचचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे त्यावेळीचे शिक्षक हे दहावीच्या वर्गामध्ये आले. त्यावेळी शिक्षक के एस काळे,आढाव व लिहिणार यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्या काळातील आठवणींना उजाळा देण्यात आला.
मेळाव्याचे सूत्रसंचालन याच बॅचचे विद्यार्थी नाशिकचे प्रसिद्ध निवेदक, संतोष फासाटे यांनी केले.
प्रथम गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.अविनाश काळे यांनी प्रास्तविक केले..बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची कुटुंबीयांसमवेत ओळख, त्यांचा सत्कार व बेलापूर कंपनी हायस्कुल नावाचे घड्याळ आदी भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सहचारीणीच्या उखाण्यांनी कार्यक्रमात रंगत वाढविली.अनिल औताडे यांनी निवेदकांची ओळख, शाळेतील आठवणी जागृत केल्या.
याच शाळेतील माजी विद्यार्थी अभिजीत काळे ,कुंदा सोळस, अपर्णा देशपांडे, हंसराजआदिक, अविनाश काळे यांच्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. संतोष फासाटे यांचे ओघवते निवेदन, लता मंगेशकर च्या आवाजातील गाणे, पैंजणांचा व घुंगरांचा आवाज, विविध कलाकार व नेते यांच्या आवाजातील मिमिक्री ने तर सर्वांच्या मनावर भुरळ पडून गेली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांस तसेच इतर बॅचच्या विद्यार्थ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी गुजरात, मध्य प्रदेश,जळगाव,अहमदनगर ,नाशिक इथून कुटुंबीयांसमवेत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापिका विमलताई आदिक,यशोधरा सोळस, मंगलताई दुशिंग, देशपांडेबाई, गंधे, ,सध्याचे शिक्षक बाळासाहेब वमने त्रिभुवनबाई, राजुमामा जाधव आदी उपस्थित होते.लिहिणार यांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन अर्जुन बडोगे यांनी केले.
नंतर स्नेहभोजन झाल्यावर जड अंतकरणाने, सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन बॅचचे विद्यार्थी संतोष फासाटे, अविनाश काळे ,अनिल औताडे ,संताजी जाधव, संजय नरोडे व रसूलभाई पठाण यांनी केले होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

