श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर येथील ए प्लस दी प्रिस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि.अर्शद सर ,प्राचार्य उज्वला मॅडम,कार्यलयीन अधीक्षक हुजैफ जहागीरदार आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरती मॅडम,अश्विनी मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. शाळेचे प्रशासकीय प्रतिनिधी मिलिंद शिरसाठ सर,प्रवेश प्रतिनिधी पुजारी सर यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर,नागरिक बंधू- भगीनी,मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी,पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

