रणसिंग महाविद्यालय येथे निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न
फोटो ओळ - कळंब येथे निर्भय कन्या अभियान प्रसंगी उपस्थित मान्यवर......
इंदापूर:- कळंब ता . इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान एक दिवशीय कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्घाटन समुपदेशक प्रा. किशोरी ताकवले,ॲडव्होकेट रेशमा गार्डे ,प्राचार्य अंकुश आहेर , उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले.सर्व वयोगट ,प्रवाह स्तरातील महिलांना केंद्रभूत मानून आयोजित कार्यशाळा केली आहे. महिला सबलीकरण महिलांचा, व्यक्तिमत्व विकास, स्त्रियांची प्रेरणास्थान, स्त्रियांची मानसिक स्वास्थ्य, महिलांचा सामाजिक व कौटुंबिक संवाद ,स्त्री हक्क अधिकार, स्त्रियांसाठीचे कायदे, स्त्रियांविषयी अयोग्य वर्तन, अन्याय मानसिक शारीरिक सामाजिक स्वरूपाचा आघात तसेच स्त्रियांच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचेल अशा स्वरूपाच्या वर्तन व अनुभवापासून संरक्षण प्रतिकार व प्रतिबंध इत्यादीवर आधारित व्याख्यानांचे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले असल्याचे डांगे यांनी सांगितले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. किशोरी ताकवले यांनी सद्यपरिस्थिती आणि मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.यामध्ये मानसिक आरोग्य सहृदय आहे की नाही हे तपासून पहा एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला नाते सुदृढ करा. संवाद सकारात्मक करा विचारांशी मिळते जुळते असणारे अशी मैत्री करा योग्य निर्णय घ्या शारीरिक आरोग्य चांगले ठेवा मानसिक समस्या असेल तर मानसशास्त्रज्ञ समुपदेशक यांची मतं घ्या तसेच प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.मार्गदर्शक एडवोकेट रेश्मा गार्डे यांनी महिला विषयक संरक्षण कायदे याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये अत्याचार ,छळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास, हिंसा याविषयीच्या कायद्यांची चर्चा केली, काही महिलांचे प्रश्न यावर संवाद साधला. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कुमारी स्नेहल कांबळे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण (कराटे) याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. मुलींना आपले संरक्षण करण्याकरता कोण- कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत याबाबत माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांनी महाविद्यालयातील महिलांची संख्या, महिलांची कर्तव्यनिष्ठा, महिलांनी केलेली यशस्वी प्रगतीबाबत माहिती दिली.
यावेळी उपप्रचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग ,आय क्यू ए सी प्रमुख डॉ.प्रशांत शिंदे ,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली झगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सोनाली चव्हाण यांनी मानले. मान्यवर परिचय प्रा .विद्या गुळीग यांनी करून दिला. फलक लेखन प्रा.कपिल कांबळे यांनी केले. समिती सदस्य प्रा. योगेश खरात प्रा.सुरेश वाघमोडे व गणेश ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी १३५ विद्यार्थिनी, महिला पालक , महाविद्यालयातील प्राध्यापिका उपस्थित होत्या.
-------------
...

