श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक पाॕलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली उत्तर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अशोक जिमखाना मैदानावर करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन समारंभ, मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे व अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते तसेच अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, प्राचार्य अंजाबापू शिंदे,प्राचार्य प्रसाद कोते यांचे उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेत उत्तर विभागातील अशोक पाॕलिटेक्निक ,अशोक फार्मसी,अमृतवाहिनी (संगमनेर), न्यू फार्मसी (कोपरगांव), शिवाजीराव पवार फार्मसी (पाचेगाव), संजीवनी पाॕलिटेक्निक (कोपरगांव), एम.ई.एस. फार्मसी (सोनई), इथापे पाॕलिटेक्निक (संगमनेर), फॕकल्टी पाॕलिटेक्निक (अकोले), गौतम पाॕलिटेक्निक (कोळपेवाडी), ओल्ड फार्मसी (कोपरगाव), प्रवरा पाॕलिटेक्निक (लोणी), अमृतवाहिनी फार्मसी (संगमनेर), अजितदादा पाॕलिटेक्निक (वडाळा महादेव), प्रतिभाताई पवार फार्मसी (वडाळा महादेव), ज्ञानेश्वर पाॕलिटेक्निक (भानसहिवरे), मुळा फार्मसी (सोनई) अशा १६ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार (दि.१०) रोजी दु.३ वा. संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेकरता अशोक पाॕलिटेक्निक माहाविद्यलयाचे उपप्राचार्य अरुण कडू, क्रीडा समन्वयक सचिन कोळसे यांचेसह अशोक पाॕलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

