shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी व भाग शाळांना हिंदुस्थान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड व महालक्ष्मी दूध संघ कौठळी यांच्या संयुक्त विध्यमानाने शैक्षणिक साहित्य वाटप--स्तुत्य उपक्रम

कौठळी व भाग शाळांना हिंदुस्थान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड व महालक्ष्मी दूध संघ कौठळी यांच्या संयुक्त विध्यमानाने शैक्षणिक साहित्य वाटप--स्तुत्य उपक्रम-
इंदापूर:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी व भाग शाळांना हिंदुस्थान प्रायव्हेट लिमिटेड व महालक्ष्मी दूध संघ कौठळी यांच्या संयुक्त विध्यमानाने  शैक्षणिक साहित्य(वह्या) वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अमित भोंग यांनी केले.हिंदुस्थान फिड्सचे मॅनेजर रामदास मेटकरी व मनोहर भोंडवे यांनी वह्या वाटपाचा उद्देश सांगितला तर महालक्ष्मी दूध संघ कौठळी चे चेअरमन अमोल मारकड यांनी विद्यार्थ्यांना वह्या जपून वापरण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांना चार चार वह्या मिळाल्याने सर्वजण आनंदीत झाले होते.यावेळी हिंदुस्थान फिड्सचे मॅनेजर रामदास मेटकरी, मनोहर भोंडवे,महालक्ष्मी दूध संघ कौठळी चे चेअरमन अमोल मारकड,राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत मारकड,राष्ट्रवादी सोशल मीडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष हामा पाटील,सरपंच नामदेव मारकड,मा. सरपंच हिरामण मारकड,शाळा व्य समितीचे अध्यक्ष अधिकराव माने,राहुल मारकड,माजी अध्यक्ष साहेबराव पिसाळ,शाळा व्य समितीचे सदस्य सोमनाथ पाटोळे, हनिफ शेख,राहुल मारकड,बापूराव खांडेकर यासह पालक,विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आभार उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी मानले.
close