श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूरचा इयत्ता दहावीचा निकाल 96.70 % इतका लागला असून परीक्षेत एकूण 243 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 235 विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच विशेष प्राविण्य 93 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 85 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयामध्ये सिद्धेश अण्णासाहेब गोराणे याने 97 % गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला त्याला गणित व विज्ञान विषयात शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. अवधूत अधिक जोशी यांने 96.60% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याला गणित विषयात शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांक श्रावणी देविदास कल्हापुरे हिने 96. 20 % गुण मिळवून पटकावला.
विद्यालयाच्या नेत्र दीपक यशाबद्दल बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील साळवे म्हणाले की आदरणीय मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यालयास दैदीप्यमान यश संपादन करता आले. इयत्ता दहावीच्या निकालाबरोबरच विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेतील यश सुद्धा उल्लेखनीय आहे. यामुळेच श्रीरामपूर शहरामध्ये पालकांच्या दृष्टीने काचोळे विद्यालय पाल्याच्या प्रवेशासाठी प्रथम क्रमांकचे विद्यालय ठरत आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थी व विद्यालयाचा स्टाफ यांना जाते.
यावर्षी वर्गशिक्षक म्हणून सौ मनीषा घावटे, श्रीमती तनुजा बोरावके, श्री विपुल गागरे, सौ निंबाळकर एस एस यांनी काम पाहिले. गुणवत्ता विभागाचे प्रमुख ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष सोनवणे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य श्री प्रकाश पाटील निकम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील साळवे, पर्यवेक्षक श्री बाळासाहेब रासकर, विद्यालयाच्या विविध समितीचे सदस्य यांनी अभिनंदन व कौतुक केले. विद्यालयाच्या नेत्रदीपक यशाबद्दल पालक वर्गातून सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष समाधान व्यक्त केले जात आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

