पुणे :-
आदरणीय लक्ष्मण देगळुकर यांचे निधन हे वडार समाजासाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक अपरिमित नुकसान आहे. त्यांनी 26 जून 1994 ला समाज जागृती अहमदनगर (अहिल्यानगर) येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत वडार समाजाचा महामेळावा घेऊन समाजाची शक्ती निर्माण केली होती. परंतु शरदरावांचे सरकार पडल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी शासकीय आरोग्य खात्यात नांदेड, संभाजी नगर, अहिल्यानगर पुणे येथे सिव्हिल सर्जन ते आरोग्य संचालक म्हणून सेवा करून पदमुक्त झाले,त्यांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्व शब्दात मांडणे अवघड आहे. वडार समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आणि त्यांच्या नेतृत्वामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. त्यातुन समाजकार्याला अनेकांनी वाहुन घेतले. यांचे द्योतक देगलूरकर साहेबच आहेत.
ज्येष्ठ पत्रकार व "मौब्बु" लघुपट निर्माते रमेश जेठे व शिर्डी एक्सप्रेस परिवार यांच्याकडून डाॅ.लक्ष्मणराव देगळुकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वडार समाज जागृती चा ध्यास घेऊन समाजाच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या डाॅ.लक्ष्मणराव देगळुकर साहेब यांची उणीव सदैव जाणवत राहील. त्यांच्या विचारांची आणि कार्यांची प्रेरणा आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहील.अशा महान नेत्याला शिर्डी एक्सप्रेस परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!💐💐💐💐💐

