shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकरला तीव्र पाणी टंचाई, दिवसाआड तुटपुंजा पाणी पुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त


*गावतळ्यात व टेलटँकमध्ये पाणी सोडण्याची मागणी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील गावतळ्याने पर्यायाने लगतच्या विहीरींनी ही तळ गाठल्याने तसेच टेलटँक येथील विहीरीने ही तळ गाठल्याने भोकर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई भासत असून नवनिर्वाचीत सदस्य मंडळ गावास पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी हे सर्व काही करण्यासाठी अशोकचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे यांचे सहकार्याने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून तातडीने गावतळ्यात व टेलटँक मध्ये पाटपाणी सोडावे अशी मागणी येथील नागरीकांकडून केली जात आहे.


भोकर गावास गावालगत असलेल्या गावतळ्यालगतच्या विहीरीतून पाणी पुरवठा केला जातो. येथील गावतळ्यात असलेला साठा हा मृत साठा आहे. त्यामुळे हा पाणी साठा असून उपयोग होईना. केवळ या पाण्यावर अवलंबून न राहता स्व.आमदार जयंतराव ससाणे यांचे प्रयत्नातून टेलटँक येथून ६२ लाखाची ‘भारत निर्माण’ हि पाणी पुरवठा योजना टेलटँक येथून कार्यान्वीत करण्यात आली परंतू येथे ही ग्रामस्थांचे दुर्दैव आडवे आले त्यावेळी खोदलेल्या चाळीस फुटाच्या विहीरीने ही तळ गाठला तर दुसरीकडे पावसाळ्यात टेलटँक भरल्यानंतर हि विहीर पाण्यात असते त्यामुळे हि विहीर असून हि आतापर्यंत तीतकासा फायदा झाला नाही यावर मात करण्यासाठी गेल्या सदस्य मंडळाने मोठ्या हिमतीने खोदलेली स्मशानभुमीजवळील विहीर मात्र केवळ फार्स झाला येथील एक थेंब ही आतापर्यंत गावच्या वापरात येवू शकला नाही.

पण केवळ आपले कर्तव्य म्हणा की गावाबद्दलची आस्था व प्रेम म्हणा पण गेल्या १८ वर्षापासून अशोकचे उपाध्यक्ष असलेले पुंजाहरी शिंदे यांच्या टेलटँकमधील विहीरीतून इंदिरानगर परीसरास व गेल्या वर्षापासून नव्याने झालेल्या जलजीवन योजनेद्वारे गावास पिण्याचे पाणी सुरू आहे. म्हणजे तशा अर्थाने पुंजाहरी शिंदे हेच खर्‍या अर्थाने गावाची तहान भागवत आहे हे तीतकेच खरे असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून या विहीरीचा ही तळ गाठल्याने शिंदे यांनी आपल्या १७ एकर ऊसाकडे पाठ फिरवत गावास पाणी पुरवठा सुरू ठेवला असला तरी दिवसेंदिवस स्त्रोत घटत असल्याने गावात तीव्र पाणी टंचाई आहे. दिवसाआड येणारे पाणी पुरसे नसल्याने महिलांसह नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली आहे.

प्रत्यक्षात गावासाठी खोदण्यात आलेल्या टेलटँक येथील विहीरीची खोली केवळ चाळीस फुटापर्यंत असल्याने तळ दिसत असला तरीही अद्याप उन्हाळा दिड ते दोन महिण्याचा असल्याने विद्यमान सदस्य मंडळाने तातडीने या विहीरीची खोली वाढविल्यास पाण्याचे स्त्रोत वाढू शकतो परंतू तत्पुर्वी पावसाळ्यात टेल टँक भरल्यानंतर या विहीरीवर जाण्यासाठी तातडीने येथे जीना व नुकत्याच सुरू झालेल्या चोविस तास विज पुरवठ्याचा विज पुरवठा करणे हि कामे केल्यास कडक उन्हाळ्यात ही गावाची तहान भागविने ग्रामपंचायतीला शक्य होणार आहे परंतू त्यासाठी पंचायतीतील युवा पिढीनेे इतरत्र अनावश्यक लक्ष न घालता अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने बडी सोच ठेवून अशा प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

दर वर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने सध्याचे कडक ऊन व सुटणार्‍या वार्‍यामुळे दिवसागणीक पाणी पातळी खालवत असल्याने नदीवरील बंधार्‍या बरोबरच गावालगतचे बंधारे ही भरणे गरजेचे आहे त्यामुळे लगतच्या विहीरींची पाणी पातळीत वाढ होईल त्या बरोबर पशुपालकांना, मुक्या प्राण्यांना पिण्याचे पाणी व चारा निर्मीती होईल त्याच बरोबर लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून भोकर गावतळ्या बरोबरच टेलटँक व इतर छोटे साठवन बंधारेही या आवर्तणातून भरून द्यावेत अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
तसेच हनुमानवाडी व सबस्टेशन परीसरास पाणी पुरवठा करणार्‍या स्व.जयंतराव ससाणे यांचे प्रयत्नातून साकारलेल्या ४२ लाखाच्या ‘भारत निर्माण’ योजनेला पाणी पुरवठा करणार्‍या मुठेवाडगाव पाझर तलावाने ही तळ गाठल्याने या भागास ही पाणी टंचाईच्या झळा बसु लागल्या असल्याने या पाझर तलावात ही या आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी नागरीकाकडून होत आहे.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close