इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांचा हल्ला; तीन आरोपींना अटक
इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी मिरची पावडर पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला.
सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून (क्र. MH 42 AX 1661) आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मल्हारी मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला.यावेळी गाडी मध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच उडाली खळबळ उडाली आहे.
*इंदापुर तहसीलदार हल्ला
प्रकरणी तिघांना अटक;
उपविभागीय पोलिस
झ़अधिकारी डाॅ.राठोड
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २४/०५/२०२४ रोजी ११: १० वा. चे सुमारास श्री.श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापुर ता.इंदापुर जि. पुणे हे तहसील कार्यालय येथे त्यांचे ड्युटीवर शासकीय वाहन क्रमांक एम एच ४२ ऐ एक्स १६६१ या मधुन वाहन चालक मल्हारी मखरे यांच्यासह जुना सोलापुर पुणे हायवे रोडवरून शंभर फुटी रोडकडे संविधान चौकातुन जात असताना समर्थ स्टुल्स् इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे येथे अचानक काही इसमांनी पांढ-या रंगाची विना नंबरची काळया काचा असलेली स्कार्पीओ गाडी रोडला आडवी लावुन श्रीकांत पाटील हे तहसिल ऑफिस येथे जात असताना सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व लाल मिर्ची पावडर डोळयावर टाकुन तहसीलदारांच्या वाहनाच्या सर्व काचा फोडुन जिवे ठार मारण्याचा कट रचुन प्रयत्न केल्याने इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ४५४/२०२४ भा.दं.वि.कायदा कलम ३०७,३५३,३४१,४२७,५०४,५०६,१४३,१४४, १४७,१४८,१४९,१२०(ब) सह म.पो.का.क. १३५ प्रमाणे आरोपी नामे १) शिवाजी किसन एकाड रा.बाब्रसमळा, इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे, २) विकास नवनाथ देवकर रा. सरडेवाडी ता. इंदापुर जि. पुणे, ३) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल, ४) तेजस अनिल विर, ५) माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर तिघे रा. भाटनिमगाव ता. इंदापुर जि. पुणे. व इतर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सर्वश्री डॉ. पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, संजय जाधव ,अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, पोलीस निरीक्षक एस.डी. कोकणे, इंदापुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार बुणगे हे करत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ..सुदर्शन राठोड यांनी दिली.
सदरील प्रकरणी डॉ.सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, पोलीस निरीक्षक एस.डी. कोकणे, इंदापुर पोलीस ठाणे यांनी तात्काळ इंदापुर पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेले सपोनि डुणगे, सपोनि राऊत, सपोनि पवार, पोसई राळेभात, सहा.फौज. प्रकाश माने,पो. हवा. काशीनाथ नागराळे, लखन साळवे, विनोद रासकर, अमित यादव, सचिन बोराटे, पो.ना.विष्णु केमदारणे, सलमान खान, पो.शि. विशाल चौधरी, गणेश ढेरे, सुहास शेळके, विनोद काळे, लक्ष्मण सुर्यवंशी यांची वेगवेगळी पथके नेमून सदर गुन्ह्यातील आरोपी १) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल, २) तेजस अनिल विर, ३) माउली उर्फ शुभम महादेव भोसेकर असे तिघे, रा. भाटनिमगांव ता. इंदापुर जि. पुणे. यांना तात्काळ अटक केलेली आहे.
सदरील प्रकरणी आरोपींचा वाळू तस्करीशी संबंध असल्याचे बोलले जात असून संबंधित तहसीलदार तालुक्यातील कोणत्याही अवैध व्यावसायाविरुद्ध कडक भुमिका घेत असल्याने असा भ्याड हल्ला करण्याचा जो या गुंडांनी प्रयत्न केला आहे त्याचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे,खरेतर अशा पिळावळीस वेळीच ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी वेळेतच पावले उचलल्यास असे हल्ले होवूच शकणार नाहीत करीता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष पोलिसांची फौज संपूर्ण तालुकाभर धाडावी,अन् अवैध व्यावसायिकांची पिळावळ ठेचूनच काढावी,असे जनसामान्यांतून बोलले जात आहे.
*पत्रकार शेख - इंदापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

