shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वांगीण दृष्ट्या ग्रामीण भाग विकासित होणे काळाची गरज.- कैलास पवार


लोणार प्रतिनिधी:
पुणे (वाघोली) येथील भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार व पदाधिकारी यांनी हिरडव ग्रामपंचायत तालुका लोणार जि. बुलढाणा येथे सदिच्छा भेट दिली असता ग्रामपंचायत कार्यालय व पदाधिकारी यांच्या वतीने भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था देश पातळीवर राज्यस्तरीय स्वरूपाचे करीत असलेल्या कार्याचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल आणि कार्य विशद केले तसेच ग्रामीण भाग आज सर्वांगीण दृष्ट्या विकसित झाला पाहिजे.शेती बरोबर प्रत्येक शेतकरी कुटुंबाला जोडधंद्याची गरज आहे.खेडी समृद्ध झाले तर देश सुखी होईल असे प्रतिपादन केले. यावेळी उद्योजक अशोकभाऊ घायाळ पाटील यांनी भूमी फाउंडेशन ने नव्याने सुरू केलेला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी पुणे येथील निवासी प्रकल्प याची माहिती दिली.हा प्रकल्प अजून मोठ्या गतीने पुढे गेला पाहिजे यासाठी सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तसेच यावेळी असंख्य ग्रामस्थांनी भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांचे शाल श्रीफळ देऊन आपल्या गावात स्वागत केले.

*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close