shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत नेहमी स्वतःला सिद्ध करावे - करण ससाणे


श्रीरामपूर प्रतिनिधी :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेण्याची किमया प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने साध्य होऊ शकते. त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन नेहमी स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.

स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ,श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, श्रीरामपूर शहर काँग्रेस व साई सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर हे होते. 
ससाणे पुढे म्हणाले की, सध्याच्या जीवनशैलीत सर्वत्र स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारामुळे, मुलांना योग्य दिशा मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले संस्कारही जपले पाहिजेत असेही ते म्हणाले.यानंतर जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, ध्यैय समोर ठेवून जिद्दीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळते यासाठी नेहमी जिद्द बाळगली पाहिजे असे ते म्हणाले.
        यावेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडवण्यात पालकांचेही मोठे योगदान असते, त्यामुळे मुलांचा कल बघून त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी दिली द्यावी असे ते म्हणाले.
         यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या कठोर परिश्रमातूनच यशाचा मार्ग मिळतो,करीता परिश्रमात समझोता न करता सातत्याने परिश्रमाकडेच आपले लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले.
         याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ससाणे व संबंधितांना धन्यवाद दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगरसेवक रमेश कोठारी, सुनील बोलके, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे,रितेश रोटे,बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण, काँग्रेस पक्षाचे समन्वयक प्रवीण काळे,मर्चंट असोसिएशनचे दत्तात्रय धालपे,निलेश नागले, संजय कासलीवाल, प्रकाश थोरात, बाळासाहेब थोरात, गफ्फार पोपटिया, प्रवीण नवले,मा. सरपंच भारत तुपे,अशोकराव जगधने,चांगदेव भागवत, सुरेश ठुबे, सुनील साबळे, जावेद शेख, युवक काँग्रेसचे अमोल नाईक, रितेश चव्हाणके, जाफर शाह, अल्पसंख्यांक काँग्रेस चे सरबजीतसिंग चूग, रियाजखान पठाण, भैय्याभाई आतार, रणजीत जामकर, युनुस पटेल, सुरेश कालंगडे, विशाल साळवे, अंबादास निकाळजे, संजय गोसावी, राजेश जोंधळे, श्रेयस रोटे, जियान पठाण, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी, सिमोन चुग,प्रशांत आल्हाट आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close