सत्यात्तर वर्षे स्वातंत्र्यानंतरही डॉक्टरांना या देशात मारहाण व अन्याय सहन करावा लागत आहे. देशातील नागरिकांचे आयुष्यमान २७ पासून ७० वर्षे पर्यंत पोहोचले आणि नवजात बाळांचा व माता मृत्युदरात आशादायक घसरण झाली , पण या यशाच्या शिल्पकारांना निर्दयपणे मारहाण केली जाते. वैद्यकीय सेवा देत असतांना होणार्या अनपेक्षित अपघातांसाठी डॉक्टरांवर खुन्यांप्रमाणे खटला चालवला जातो, माणुसकीच्या मर्यादा पार करुन डॉक्टरांकडून २४ तास काम करुन घेतले जाते,कोर्टात अवाजवी भरपाईचे निर्णय दिले जातात.
देशातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच देवी आणि पोलिओसारखे आजारांचे निर्मूलन झाले, प्लेग आणि कॉलरा नाहीसे झालेत. कुष्ठरोग, मलेरिया आणि क्षयरोग नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. बालमृत्यू कमी होण्याच्या यशाचे वाटेकरी देशातील बालरोगतज्ज्ञ व यांच्या माध्यमातून झालेल्या लसीकरणाची मोहीम.सुरक्षित गर्भारपण व प्रसुती या उपक्रमाद्वारे मातामृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रसूतीतज्ञांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. १५९८ आधुनिक वैद्यकशास्त्र डॉक्टरांच्या बलिदानामुळे कोविड १९ वेळेत नियंत्रणात आला . कारगिलच्या युद्धात ५०० सैनिक हुतात्मा झालेत आणि हे कृतज्ञ राष्ट्र त्यांना स्मरणात ठेवते. कोविड युद्धात देशासाठी शहीद झालेल्या डॉक्टरांना मात्र हा सन्मान मिळाला नाही, हा अन्याय नाही तर दुसरं काय आहे ?
-या देशातील प्रत्येक डॉक्टर हिंसेच्या जीवघेण्या भीतीने जगतो
-डॉक्टर्स सतत भीतीच्या सावटाखाली असतात.
• डॉक्टरांवर अमानवी कामाचा भार आहे, मानसिक तणावाची पातळी वाढली आहे,आत्महत्येचे प्रमाण वाढलेय .
- देशाचे आरोग्य सांभाळतासांभाळता डॉक्टर्स कमी वयातच ह्रदयरोगाला बळी पडत आहेत.
- डॉक्टरांवरील हिंसा पण आरोपींना मात्र अभावानेच शिक्षा, ही व्यवस्था बिघडल्याचे प्रतिबिंबित करते,
-या देशात सोनोग्राफीचा फॉर्म न भरल्यास स्त्री भ्रूणहत्या झाली असे समजून डॉक्टरांना शिक्षा होते. केवळ डॉक्टरंनाच अशा बंधनांनी गुलामगिरीत का बांधले जाते?
अन्यायकारक !
स्वातंत्र्यानंतर या देशात नागरिकांना मिळालेल्या हक्कामधून डॉक्टरांना डावलले,असे वाटतेय. आरोग्यसेवेचे औद्योगिकीकरण ही धोरणात्मक त्रुटी आहे. शासनाच्या अपुरेपणाची व अनियमिततेची आम्ही कधी तक्रार करीत नाही.
आम्ही ना मारेकरी आहोत ना व्यापारी !
ना आहोत आम्ही गुंडाच्या टोळ्या !!
आम्ही नसोत 'सॉफ्ट टार्गेट' !
नाही द्वितीयश्रेणी नागरिक !!
संमतीने आमच्याच करावे शासन आमच्यावर !
अन्यथा होईल प्रतिकार अन्यायाचा !!
डॉ.आर.व्ही. अशोकन*
राष्ट्रीय अध्यक्ष
इंडियन मेडिकल असोसिएशन
*विशेष सहयोग*
डॉ.रविंद्र कुटे
माजी अध्यक्ष आय एम ए.( महाराष्ट्र राज्य)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

