shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल दहावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल


श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक सहकारी साखर कारखाना संचलित माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच समन्वयक तथा कारखाना संचालिका मंजुश्री मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स ॲण्ड आर्टसचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. यात कु.श्रुती सुधीर उंडे (८९.८० टक्के) हिने प्रथम, कु.वैष्णवी अजित गायकवाड (८८.४० टक्के) द्वितीय, तर कु.जागृती रावसाहेब शेळके (८८.२० टक्के) हिने तिसरा क्रमांक मिळविला.


अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स ॲण्ड आर्टस, प्रगतीनगर या महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यावेळीही कायम राखल्याचे कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य संपत देसाई, प्रा.प्रतिभा तागड, प्रा.गणेश हाळनोर, प्रा.सागर कोकणे, प्रा.मधुरा कुंदे, प्रा.रुपाली शिरसाठ, प्रा.कविता राजुळे, प्रा.स्वाती वाबळे, प्रा.सुजाता डावखर, प्रा.अक्षय सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
          सर्व यशस्वी विद्याथ्यांचे माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, सोपानराव राऊत, उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, समन्वयक सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सचिव विरेश गलांडे, सहसचिव विजयकुमार धुमाळ, अशोक ग्रामीणचे सहसचिव भास्कर खंडागळे तसेच कारखान्याच्या संचालक मंडळाने कौतुक केले आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close